तुळसूली कर्याद, नारूर येथे SMART सोलर योजना संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. राजेंद्र कामथे साहेब, उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, ओरोस विभाग हे उपस्थित होते.
या वेळी श्री.कामथे साहेबांनी “SMART सोलर म्हणजे काय, ही योजना कोणासाठी आहे, ग्राहकांना याचा कसा लाभ होऊ शकतो तसेच सोलर प्रकल्प बसवल्यानंतर वीजबिलावर काय परिणाम होतो” याबाबत सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली. त्यांनी घरगुती वीज ग्राहकांनी रूफटॉप सोलरचा अवलंब केल्यास वीजबिलात मोठी बचत कशी शक्य आहे, याचे सुलभ उदाहरणांसह स्पष्टीकरण केले. तसेच उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे समाधानही त्यांनी केले.
याच कार्यशाळेत दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्पाची तांत्रिक माहिती, बसवण्याची प्रक्रिया, सुरक्षितता, नेट मीटरिंग, देखभाल तसेच शासकीय अनुदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला गावाचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी SMART सोलर योजनेविषयी सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात सोलर प्रकल्प बसवण्याची तयारी दर्शविली.
ही कार्यशाळा ऊर्जा स्वयंपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.