ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर कार्यशाळेचे आयोजन

SMART SOLAR SCHIME
Spread the love

ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजना संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेमध्ये श्री. म्हेत्रे साहेबउपविभागीय उपकार्यकारी अभियंता, मालवण विभाग तसेच मालवण ग्रामीणचे मालवण ग्रामीण शाखा दोन शाखा अभियंता श्री. केकान साहेब हे SMART सोलर योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. SMART सोलर म्हणजे काय, योजनेचे लाभ, घरगुती वीज ग्राहकांना होणारी वीज बचत तसेच वीजबिलावर होणारा परिणाम याबाबत माहिती दिली जाणार आहे.

या कार्यशाळेचे आयोजन सरपंच ग्रामपंचायत हडी  तसेच दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these