ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजना संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये श्री. म्हेत्रे साहेब, उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, मालवण विभाग तसेच कट्टा उपविभागाचे श्री. कांबळे साहेब हे SMART सोलर योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. SMART सोलर योजना म्हणजे काय, योजनेचे लाभ, घरगुती वीज ग्राहकांना होणारी वीज बचत तसेच वीजबिलावर होणारा परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली जाणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत सुकळवाडचे सरपंच तसेच दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.