1️⃣ सोलर बसवण्यासाठी किती जागा लागते?
उत्तर: साधारणपणे 1 kW सिस्टीमसाठी 90 ते 100 चौरस फूट छताची जागा लागते. जास्त क्षमतेनुसार जागा वाढते.
2️⃣ 3 kW / 5 kW सिस्टीमची किंमत व सबसिडी किती मिळते?
उत्तर: किंमती कंपनीनुसार बदलतात, पण सरकारी PM Surya Ghar योजनेत 40% ते 60% पर्यंत सबसिडी मिळते.
5 kW पर्यंत सबसिडी उपलब्ध.
3️⃣ माझ्या घराला किती kW सोलरची गरज आहे?
उत्तर:
- 1–2 BHK घर — 2 kW – 3 kW
- 2–3 BHK — 3 kW – 5 kW
- जास्त लोड/AC वापर — 5 kW – 7 kW
तुमच लाइटबिल पाहून नेमकी क्षमता ठरवता येईल.
4️⃣ सोलर बसवल्यावर बिल किती कमी होईल?
उत्तर: योग्य क्षमतेचा सिस्टीम बसवल्यास बिल जवळपास 80–100% कमी होते.
5️⃣ सोलर पॅनलची वॉरंटी किती असते?
उत्तर:
- पॅनल: 25 वर्षे
- इन्व्हर्टर: 10 वर्षे
- स्ट्रक्चर/इन्स्टॉलेशन: 2 वर्ष
6️⃣ सोलर पॅनल पावसात/ढगाळ हवेत चालतात का?
उत्तर: होय, चालतात. उत्पादन कमी होते, पण सिस्टीम बंद होत नाही.
7️⃣ नेट मीटरिंग म्हणजे काय?
उत्तर: तुम्ही वापरले नाहीलेली वीज ग्रिडला देणे आणि पुढच्या महिन्यात समायोजन होणे — याला नेट मीटरिंग म्हणतात.
8️⃣ सोलरचे मेंटेनन्स किती असते?
उत्तर: विशेष काही नाही.
फक्त १५–२० दिवसांनी पॅनल स्वच्छ केले की उत्तम काम करते.
9️⃣ बॅटरी लागते का?
उत्तर:
नेट-मीटरिंग सिस्टीममध्ये बॅटरी लागत नाही.
बॅकअप हवे असल्यास हायब्रिड सिस्टीम किंवा ऑफ-ग्रिड बॅटरी वापरतात.
🔟 सोलर बसवायला किती दिवस लागतात?
उत्तर:
साईट वर्क: १–२ दिवस
मंजुरी + नेट मीटर: ७ ते १५ दिवस (परिसरानुसार)
1️⃣1️⃣ सरकारी सबसिडी कशी मिळते?
उत्तर: मंजुरीनंतर संपूर्ण प्रोसेस PM Surya Ghar Portal वर होते आणि सबसिडी थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होते.