ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

ग्रामपंचायत हाडी येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शन
Spread the love

ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजनेबाबत आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मालवण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सचिन म्हेत्रे साहेब यांनी सौरऊर्जेमुळे होणारे आर्थिक फायदे तसेच पर्यावरणाला होणारे लाभ याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच मालवण ग्रामीणचे अभियंता श्री. केकण साहेब यांनी सोलर प्रकल्प बसवल्यानंतर वीजबिलावर होणारे फायदे आणि बचतीबाबत सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी सरपंच महोदयांनी ग्रामस्थांना सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

याच कार्यशाळेत दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्प, सोलर प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, नेट मीटरिंग तसेच देखभाल याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली.

कार्यशाळेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या कार्यक्रमामुळे SMART सोलर योजनेबाबत जनजागृती होऊन ग्रामस्थांनी सौरऊर्जेकडे सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these