ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. म्हेत्रे साहेब, उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, मालवण विभाग यांनी SMART सोलर योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. कांबळे साहेब यांनीही उपस्थितांना योजनेविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपसरपंच श्री. किशोर पेडणेकर यांनी ग्रामस्थांना सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.
याच कार्यक्रमात दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्प, सोलर प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, नेट मीटरिंग व देखभाल याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले असून SMART सोलर योजनेबाबत जनजागृती झाल्याचे दिसून आले.